Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kshitija Pimpale

Others

1.1  

Kshitija Pimpale

Others

सप्तपदी

सप्तपदी

1 min
459


हात तुझा माझ्या हाती

नाही केवळ दिसण्यासाठी

सात जन्माचे नाते म्हणुनी

स्वर्गात जुळल्या मंगलगाठी....


तथ्य आहे का खरंच यात

प्रश्न आजही पडतो मला

हात हाती असूनदेखील

एकांत का छळतो मला .....


ओढ असावी अंतरातून

हात नसेल हातात जरी

कसे जुळतील सुर जीवनाचे

प्रेमभाव जर नसेल अंतरी .....


मागितले होते तुजकडे

स्नेह आपुलकी अन जिव्हाळा

होता मलाही फुलवायचा

तुझ्या संगतीने प्रीतमळा .....


सात वचने दिली परस्परांस

घेवुनिया हात हाती

सप्तपदी चालले अन

जीवनाची झाली माती .....


Rate this content
Log in