सफर पावसाची...
सफर पावसाची...


कोवळ्या उन्हासोबत आलेली अलगद श्रावणसर,
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर,
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर....
तुषार किरणांनी साकारलेले इंद्रधनु....
तुझ्या माझ्या प्रेमाची सप्तरंगी प्रतिमाच जणू
हळूवार दाटता मेघ नभी.....
हळूवार पसरतो गारवा....
सर्वांग फुलते आगमनाने,
भरुन वाहतो मनी....
स्पर्श नवा... हर्ष नवा...
बरसतो बर्षाऋतू,
चिंब ओला उधाणलेला...
मनी नवस्वप्नांचा,
अविरतसा झुलतो झुला...
बरसतील धुंद आता. पाऊसधारा....
भिजेल चिंब चिंब आसमंत सारा....
तहानलेल्या मनांना सुखाविल टप टप थेंबांच येण....
धरतीही गाईल मग पावसाच गाणं....
तहानलेल्या त्या धरतीलाही ,
आता चिंब चिंब भिजायच....
पहिल्या पावसाच्या थेंबानी,
एवढ का मग लाजायचं....