सोसाट्याचा वारा
सोसाट्याचा वारा
आज वारा सोसाट्याचा
वेग धरी तुफानाचा
कोण अडवे तयाला
जोर बेफाम तयाचा
धाडधाड घरांवरी
आक्रमण वेगे करी
गरीबांच्या झोपड्यांना
तडाख्यांनी भुईवरी
दूर दिसे गलबत
भार्या झुरते मनात
कधी येईल सखया
झरझर नयनात
कसा आक्राळविक्राळ
असा नको बेलगाम
थरथरे वसुंधरा
कसा झालास उद्दाम!!
शांत हो रे हळुवार
तुझी लहर मोहिनी
मंद झुळुक येताच
शिरशिरी तनमनी