संत तुकाराम
संत तुकाराम
जगताचे गुरू
जपा तुकाराम
नामे कापे यम
थोर संत
शांतीचे सागर
वैराग्याची मूर्ती
जगी त्यांची किर्ती
गातो आम्ही
ग्रंथच महान
तुकाराम गाथा
झुकतोच माथा
जगताचा
शब्दांचीच रत्ने
आम्हा घरी धन
मृत्तिकेसमान
सोने चांदी
आवडीचा मंत्र
राम कृष्ण हरी
पंढरीची वारी
नित्यनेमे
स्वर्गात सदेह.
वैकुंठ गमन
गरूड वहन
बसूनिया
पांडुरंग सखा
हरीनाम मुखी
जीवनात सुखी
सदोदित