संत सावता माळी
संत सावता माळी
1 min
250
कर्मात घडे ईश्वरसेवा
बोध देई सावता
कर्तव्य पूर्ण करावे
बाळगूनी निर्भयता ॥१॥
सावता म्हणे करा चिंतन
ईश्वराचे होई दर्शन
अंधश्रध्दा सारून दूर
घडावे मत परिवर्तन ॥२॥
सावता फुलवी प्रेमाचा मळा
विठ्ठल नाम त्याच्या गळा
आसिम भक्ती घडे
विठ्ठल देखियेला डोळा ॥३॥