संस्कारांचे धिंडवडे
संस्कारांचे धिंडवडे
लेडिज फस्ट, पहिले आप, प्रथम तु
म्हणत देतात म्हणे मान 'ती'ला
फक्त जगासमोर दाखवण्या...
वाटत असे करतांना ते
सत्ता गाजवता 'ती'वर
बंधन घालता 'ती'वर...
'ते' सांगतील
तसेच 'ती'ने
वागायचे असते...
झुगारला आदेश
त्यांचा 'ती'ने
तर निघते
'ती'च्या
संस्कारांचे धिंडवडे!!!