संशय
संशय
संशय पोखरे | पाळंमुळं सारी||
जिवनाची वारी |जायी वाया ||१||
नका वागू असे |बळावे भावना ||
होतील यातना | संशयाने ||२||
सोडवावा पेच | नाजूक प्रसंगी ||
जिवन बेरंगी | नैराश्यात ||३||
विश्वासाचा सूर | धरावा कायम ||
वाणीस नरम | ठेवुनीया ||४||
बळी नका जाऊ |परक्या लोकात ||
ठाम मांडा मत | विश्वासाने ||५||
संशयाचे भूत | ठेवावेच दूर ||
विरोधाचे सुर |थोपवूनी ||६||
सुप्रिया वदते |पाळावे नियम ||
असावा संयम | संसारात ||७||