सण होळीचा
सण होळीचा
आला , आला हो .. होळीचा सण आला
चला चला हो रंग खेळू चला ।। धृ ।।
रंगा रंगात , रंगून जाऊ
चिंब चिंब होऊनी , रंगात न्हाऊ
मन मनास आनंद हा झाला ... ।।१ ।।
कृष्ण सखा वाजवितो बासरी
मनी धुंद होते , राधा बावरी
बासरीचा सूर कसा नभी घुमला .... ।। २ ।।
यमुनेच्या तीरावरी खेळ रंगला
गोपिकांसवे तो कृष्ण रंगला
पंचमीचा सण हो आज आला ... ।। ३ ।।