Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

सण होळीचा आला

सण होळीचा आला

1 min
7.0K


 फालगून मासी मोद मनाशी

पळस कसा फुलला

चाहूल मनाला सण होळीचा आला ------ || धृ ||

नीळ्याा आभाळी सांज सकाळी

फुले किती साजीरे 

झुळूक येता वाऱ्याची मगं कशी डोलती तुरे

उंच डोंगरी माथ्यावरती तुरा कसा शोभीला ---- || १ ||

रंग पिवळा दिसे फुलांचा शोभे डोईवरी

फुला मधूनी रंग मिळते माजा त्याची न्यारी

रंग उडवूनी आंनद मिळतो होळी खेळण्याला ------- || २ ||

नर नारीचा खेळ बहरला आंनद तो मनी झाला

घेऊन रंग होऊन दंग दुःख मनाचे भुलला

सण होळीचा पुरण पोळीचा स्वाद किती त्याला -|| ३||

येता आठवण होळी सनाची मनात मोहर फुले

त्या खेळावर नाचत बागडत मन सर्वांचे डुले

वर्षभराचा सण होळीचा आवडतो मजला ----- || ४||

 


Rate this content
Log in