Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

संकल्प

संकल्प

1 min
148


बोलाची कढी ,बोलाचा भात

शुभेच्छांसाठी पुढे आमचा हात

जागतिक पर्यावरणाची करू बात

पेटवूनी मनी जाणिवेची वात...

प्रदूषणाची करुनी बरसात

केली निसर्गाची वाताहात

झाली वृक्षांची कत्तल अतोनात

ठेवुनी नीतिनियम बासनात...

आता व्हावे शहाणे थोडे

पडले जरी मनाशी हो कोडे

ऐकुनी बोल हे मौल्यवान खडे

नाते निसर्गाशी पुन्हा जडे....

एकच वृक्ष लावूनी

राना ,वना प्रांगणात

नाव मागे ठेवूया आपले

आपल्याच निसर्गात...

म्हणतील पोरे बाळे

नाती नातवंडे

आजोबांचे नवं नवे फंडे

पाहुनी घालवू आनंदात संडे....

जागतिक पर्यावरण दिनी

संकल्प करूया चांगला

एक झाड लावूनी चला

सजवूया निसर्गाचा बंगला....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action