संगिनी
संगिनी
जीव गुंतला तुझ्यात असा
स्वप्न भासे क्षण हा जसा
रातदिन लागे ध्यास तुझा
तुझे प्रतिबिंब दिसे पाहता आरसा
वाहिले मी सख्या साजना
तुझ्या पायी प्रीत बावरी
कळ्या गाली खुलती कशा
नजर जाहली अशी लाजरी
साथ दे मला आजीवनी
अधुरी नको ठेवू तू कहाणी
श्वासाची एकच आस ही
व्हावे तुझी मी संगिनी