Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sayli Kamble

Inspirational

4.3  

Sayli Kamble

Inspirational

संभ्रम

संभ्रम

1 min
426


आजचा दिवस होता माझ्यासाठी अगदीच वेगळा

कारण आज असणार होता माझा ऑफिसचा दिवस पहिला


ऐरवी मी लवकर उठायचो, फुटबॉल प्रैक्टीसला

आज मात्र तयार झालोय ऑफिसला जायला


नवी संधी, नवा अनुभव म्हणून मन उत्साहित होते

पण प्रैक्टीसला जाता न येण्याने चुकल्यासारखे वाटत होते


घेऊन सगळ्यांच्या शुभेच्छा, निघालो नव्या उमेदीने

दुसऱ्याच गेट जवळ सोडलं होतं आज मला रिक्षाने


ऑफिसच्या जवळच दिसले मैदान फुटबॉलचे

थांबलो क्षणभर संभ्रमात मी, उठले वादळ विचारांचे


ऐकलं होतं कीे मन धावत असते स्वप्नांच्या मागे

मला मात्र दिसत होते स्वप्न नी करियर एकमेकांसमोर उभे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational