समाज
समाज

1 min

11.7K
समाजात असतात खूप
कायद्याचे हो पालन
जाती-जातीमध्ये नेहमी
भेदभवाचे आधी कालवण
समाज असतो स्त्रियांसाठी
मान आणि त्यांचा सन्मान
तरीही स्त्रियांना समाजात
मिळत का नाही स्थान
समाज असतो हक्कासाठी
लढणारा नेहमी पाया
का मिळवून देत नाही
पूर्ण समाजाला हो छाया
समाजात जगतांना आधी
करायचा जातीभेद दूर
तेव्हाच जीवनात येणार
हास्याचा हो खूप पूर