Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Warade

Tragedy Romance

5.0  

Pandit Warade

Tragedy Romance

सख्या तुझ्या विरहात

सख्या तुझ्या विरहात

1 min
708


सख्या तुझ्या विरहात 

मन झाले चोळामोळा

शब्द तुझा ऐकू यावा

कानी प्राण झाले गोळा।।१।।


क्षितीजाच्या पलीकडे

सूर्य मावळता झाला

सख्या तुझ्या विरहात

जीव कासावीस झाला।।२।।


परतले पशू, पक्षी

आपापल्या घरट्यात

सले विरहाचा काटा

हृदयाच्या गाभाऱ्यात ।।३।।


मंद शीतल प्रकाश

नभी चंद्र डोकावतो

वाट तुझी पाहतांना

जीव भयभीत होतो ।।४।।


किती तुझी वाट पाहू

साज शृंगार थिजला

अश्रू पुसता पुसता

माझा पदर भिजला ।।५।।


जीव रात्रीला कुढतो 

सख्या तुझ्या विरहात

कशी जाळते तनूला

मंद चांदण्याची रात ।।६।।



Rate this content
Log in