शुभेच्छा
शुभेच्छा
शब्द शब्द जुळताना
आविष्कार प्रतिभेचा
संधी दिधली मजला
व्यक्त समूही होण्याचा (१)
उपक्रम विविधांगी
सन्मानच साहित्याचा
व्यक्त आपापल्या परि
धन्य गौरव काव्याचा (२)
लाभे योग्य शिकवण
काव्यरस विविधता
षडाक्षरी अष्टाक्षरी
मोद मनी जमे वृत्ता (३)
व्हावे कुशल सर्वांगी
प्रशासक मनी आस
कौतुकाची थाप देई
कधी देई सूचनांस (४)
गद्य पद्य साहित्याचा
येथे नित्यचि सन्मान
कवी लेखक निपुण
प्राप्त पुरस्कार मान (५)
आज तृतीय वर्षाचा
सुमंगल दिन आला
यश कीर्ती समूहाला
लाभो उत्तुंग यशाला (६)