श्रमाचे महत्त्व
श्रमाचे महत्त्व
1 min
380
अरे माणसा माणसा
असा कसा रे वागतो
म्हणे नशीब फुटके
सुख देवाला मागतो
आयुष्याच्या संगतीला
सुख-दुःख दोन बाजू
नाही पर्याय कष्टाला
सांगे भाग्याचा तराजू
जन्मे गरीब श्रीमंत
असे संघर्ष जीवनी
फक्त कर्म सर्वश्रेष्ठ
देई विश्वा कलाटणी
बिसंबूनी तुम्ही कधी
राहू नये नशीबाच्या
लिहा नशीब कर्माने
पानावर आयुष्याच्या
जर विश्वास कर्तृत्वी
फळ भेटे आपोआप
हस्तरेखा पत्रिकेचे
कधी नको मोजमाप
गोष्ट महत्त्वाची कधी
नको माणसा विसरू
नशीबाला सोडूनिया
कास शिक्षणाची धरू