Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dattatraygir Gosavi

Classics

4.0  

Dattatraygir Gosavi

Classics

श्री राम जप माळ (१०८) १ पूर्ण जप

श्री राम जप माळ (१०८) १ पूर्ण जप

1 min
122



राम राम म्हणा रे

तुम्ही राम राम म्हणा

राम कृष्ण हरी रे

तुम्ही राम राम म्हणा

राम राम म्हणा रे

तुम्ही राम राम म्हणा ।।धृ।।


उगीचच झोपतो तो 

त्याला आ राम म्हणा।

घेतलेले परत देत नाही

त्याला ह राम म्हणा।।१।।


झोपलेला उठत नाही

त्याला हे राम म्हणा।

मित्रा सारखा वागतो

त्याला सखा राम म्हणा।।२।।


राजाचाही आदर्श जो

त्याला राजा राम म्हणा।

ह्रदयी ह्रदयीचे जानतो

त्याला आत्मा राम म्हणा।।३।।


एक पत्नी एक पती

त्यांना सीता राम म्हणा।

भगवतं पाय पुजतो

त्यांना तुका राम म्हणा।।४।।


हाती घेई शस्त्र परशु

त्यांना परशु राम म्हणा।

दास उभा भगवतांचा

त्यांना राम दास म्हणा।।५।।


भला सेवा व्रती उभा

त्याला सेवा राम म्हणा।

गोड मेवा बनवतो

त्याला मेवा राम म्हणा।।६।।


राम प्रहरी उठवितो तो 

त्याला आला राम म्हणा।

कृष्ण वाजवितो पावा

त्याला बन्सि राम म्हणा।।७।।


मरा मरा करी वाली

रामा यण कर्ता बाणा

तुम्ही राम राम म्हणा

आता राम राम म्हणा।।८।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics