श्री दत्त दिगंबर/श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा
श्री दत्त दिगंबर/श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा
दत्त दिगंबर अत्रीऋषी नंदना
श्री दत्तात्रेय स्वामी अवधूता|
श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा तू
सती अनसूयाच्या दिव्य सूता||१||
अवतरलासी भूवर गांजलेल्या
जडमूढांसी भवसागर हा ताराया|
चुकवून चौ-यांशीचा फेरा होऊन
सज्ज तामसी षड्रीपूंना माराया||२||
शरण आलो अनन्यभावे दत्ता
ओवाळून सौख्य,आनंदा सारे|
आता तरी मजसी भेट द्या कृपाळा
राऊळाची ही उघडूनिया दारे||३||