श्रावणातील पहिला पाऊस
श्रावणातील पहिला पाऊस
1 min
222
श्रावणातील पहिला पाऊस
सर्वांना हवा हवासा वाटतो
कोसळताच सरी रिमझिम
आनंद काळजामध्ये दाटतो
जीवनात क्षण सुखदुःखाचे
रात्री मागून येतोच दिवस
तसेच गणित श्रावणातले
क्षणात ऊन क्षणात पाऊस
श्रावण सरी कोसळल्यावर
हिरवी होते चराचर सृष्टी
गवत फुलांची झालर शोभे
बघणाऱ्यांची खुलतसे दृष्टी
ऊन कोवळे तांबूस पिवळे
इंद्रधनूचा गोफ नभांगणी
मोर थुई थुई वनी नाचतो
पक्षांचा किलबिलाट अंगणी
श्रावणातला पहिला पाऊस
जागवितो मधूर आठवणी
प्रेमी जणांच्या मधुर प्रीतीची
प्रेमकथांची करी साठवणी