Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vijay Sanap

Fantasy

2  

Vijay Sanap

Fantasy

श्रावण

श्रावण

1 min
6.8K


आला श्रावण महिना

सण पंचमीचा आला

बंधू महा पाठीराखा

येतो मुऱ्हाळी घ्यायला ।।


झोका खेळता रमता

येता श्रावणाच्या सरी

सखी झाल्या ओल्या चिंब

शालू भिजे जरतारी ।।


श्रावणाच्या स्वागताला

नभी बांधले तोरण

मेघ दाटले आकाशी

आलं आभाळ भरून ।।


शालू हिरवा हिरवा

माय धरणी नेसली

श्रावणाचा गार वारा

धरा गालात हसली ।।


ऊन पावसाचा खेळ

राना वनात चालती

येता श्रावणाच्या सरी

माता काळी बहरती ।।


श्रावणाच्या पावसानं

बळीराजा सुखावला

त्याच्या मनाचा गाभारा

जणू मोहर फुलला ।।


येता आषाढ श्रावण

पोथी पुराण चालती

मह्या बापाच्या अंगणी

टाळ मृदंग वाजती ।।



Rate this content
Log in