शोध
शोध
1 min
264
उतरत जाणारी सांज
डोळ्यात तुझं अस्तित्व
पेरून जातात बघ
स्मृतीच्या काळ्याशार डोहात
झोकून देत स्वतःला
झरझर उतरत जाते अक्षरांची ओंजळ मनाच्या कागदावर माझ्यासोबत गहिवरते वाट हिरमुसतात दमलेले पक्षी
रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र
मिटत जातं अंतर
रवि तेजाने न्हाते सृष्टी
खडा पहारा दाटतो आकाशभर
सुरू होतो अंतराचा प्रवास
पुन्हा नव्याने तुला शोधण्यासाठी...