Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Others

4.0  

BABAJI HULE

Others

शोध माणसातल्या माणसाचा

शोध माणसातल्या माणसाचा

1 min
219


शोध माणसातल्या माणसाचा

आज घराचे आधार स्तंभ कोसळत आहेत 

उभारलेल्या भिंतीही ढासळत आहेत 

रस्त्यावर ओशाळलेल्या गर्दीत 

माणूस माणसालाच माणसात शोधत आहे

 

झाली कितीही घराची पडझड तरी 

मोठ्या ताकदीने उभा राहू पाहत आहे 

उध्वस्त अवस्थेत नात्यांचा ओलावा आटत आहे 

माणूस माणसालाच माणसात शोधत आहे 

 

घरातल्या कोणीही एकाच जाणं 

घर सुन्न मनाने उजाड करत आहे 

धीरानं एकमेकांचे आसवं पुसत आहे 

माणूस माणसालाच माणसात शोधत आहे 

 

छोट्यांच्या आणि तरुणांच्या भवितव्यासाठी 

स्वतःकडे मात्र तो दुर्लक्ष करत आहे 

शांत मनाने जगाचा निरोप तो घेत आहे

माणूस माणसालाच माणसात शोधत आहे 

 

कितीही असला मनाचा मोठेपणा 

तरी क्षणापुरता बाजूला तो ठेवत आहे 

आपल्यातल्याच आपल्याना दूर तो करत आहे 

माणूस माणसालाच माणसात शोधत आहे

 



Rate this content
Log in