शीर्षक :- वारांगना...
शीर्षक :- वारांगना...
अनादि,अनंत अवकाशाचा
एक अंश म्हणून
जन्माला आलेली 'ती'!..
पण..वारांगना म्हणून कैक न संपणारे प्रश्न,शारिरीक,मानसिक क्लेश जणू तिच्याभोवती
अविरत फिरणार्या वर्तुळाच्या परिघावरच राहिले
एक बिंदू बनून!...
पोटाची आग व भूक,
घ्यायला लावते तिला माघार
अगतिक होऊन अन मग
द्यावे लागतात तिला कित्येक
अस्वस्थ प्रश्न,सामाजिक भान,
चिंता सोडून!...
स्वअस्तित्वांचंही भान न ठेवता
'ती' करते सहन
नित्य सवयीचं शोषण!...
कधी पदराआडून तर
कधी पडद्याबाहेरून
कधी त्याच्या तोंडून बाहेर पडणार्या दारूच्या वासात,
कधी धुराच्या वलयांत
व्याकुळ होऊन...!
पण,
'ती'त्याच शोषणाकडे पाहते,
अगदी अलिप्तपणे!
कारण...
हे शोषण आवरणं तिच्या आवाक्याबाहेर अन,
श्वास फुटेपर्यंत
शरीर सोडत नाही अन
शरीरात श्वास असेपर्यंत
तिच्या सोसण्याबलोबरच भूख
आणि शोषणही.................!!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©®
