शीर्षक :- तुझ्याविना...!
शीर्षक :- तुझ्याविना...!
(दशपदी)
पाणी डोळ्यात दाखवते हासू ओठावर,
दिनरात कशी सरते कळेना तुझ्याविना..
नयनी काजळ लावते लाली लाल ओठी,
शृंगाराला अर्थ काही उरेना तुझ्याविना..
केस सावरते उडते मन वार्यावर,
वेणीस गजरा कुठला शोभेना तुझ्याविना..
नजर भिरभिरी शोधते कुणाला मैफिलीत,
सुरास नशा कुठला चढेना तुझ्याविना..
स्वप्नात अन श्वासात जाणवते जागेपण,
जीवन सत्य की स्वप्न उमजेना तुझ्याविना....!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©®

