शीर्षक :- शुभ्र पांढरा कागद...!
शीर्षक :- शुभ्र पांढरा कागद...!
भरून येते मन आतले
तेव्हा आरशाला कुठे काय कळतं?
शब्द असतात मनातले
ते कागदाला कुठं समजतं?
स्मृती जेव्हा होतात जाग्या
खूप येतात आठवणी
आणि..गाव कवितेचं लागतं,
शब्दांचं तळं...निळंशार निळं
त्यातले पांढर्या कागदाशिवाय कुणाला काय कळतं?
वाटतं क्षणभर!
रद्दीच तर होतात ना
केव्हा तरी कागद,पुस्तके अन् माणसं..
भाव आहेत बदलणारे
त्यातलं मला नाही कळत फारसं..
मोह असतात किती स्वैर!
कधी गुलकंद फुलातले दाटावे
कोणाला वाटतीलही ते गैर..!
त्यातले मला काय कळावे?...
होते उतरून गेले कायेवरून
आणि बदलून प्रेम गेले
शब्दांचे अनुभवच तर देतात दाखवून
शुभ्र पांढर्या कागदाला काय कळाले?
पण,
ते उतरवायलाही समोर असावाच लागतो,
शुभ्र पांढरा कागद.......!!
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
