शीर्षक :- प्राक्तनाच्या अंगणात...
शीर्षक :- प्राक्तनाच्या अंगणात...
माझ्या डोळ्यात रोशनी
दिप्त दिवेही प्रीतीचे
नाही सोबतीला हात
काळोखही अंधाराचे!
आत पेटत्या मशाली
धग ज्वाळांचे सोसणे
अशी फुले प्राक्तनाची
उरी काट्यांचे टोचणे
कोण भरात मोरही
जाई रानात नाचुनी
स्वप्न शोधताना तोही
ठेवी मागे पीस खुणी
रात्र टपोर चांदणी
चुकारते थेंब ओला
भास पावसाचा कसा
माझ्या मनातच झाला
श्वास-श्वास जगण्याचा
जातो दिलासा देउनी
प्राक्तनाच्या अंगणात
स्वप्नपक्षी खुणवुनी
तरी..नक्षत्रांत भास!
कधी गंधारली फुले
शून्य रिक्ततेत वाटे
किती कोडगे जगले
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
