शीर्षक :- पैसा झाला मोठा...!
शीर्षक :- पैसा झाला मोठा...!
वाटे व्यर्थ जीवन हे,
श्वास...नि:श्वासी अडकताना..
कैक...ती मनास प्रलोभने,
लोभास...अर्थ जुळताना...! १.
किती शापित वंचनांचे,
भार होती पेलताना..
अन्न,वस्त्र,निवारा,
मुलभूत गरजा भागविताना...!
दूर किती आलो आपण?,
सारे अर्थात गुंतलेले..
जरा करता आत्मपरीक्षण,
दिसेल मोक्षद्वार उघडलेले...!
रूंद झाले रस्ते आता,
गाव,वाडे पुनर्वसनात गेले..
परिस्थितीच की..काय झाले?,
नातेसंबंधही ते दुरावले...!
उंच इमारती..पेठ,दुकाने,
सुख चलनाचे वाटू लागले..
भाऊ-बंदकीत चुरस लागूनी,
नात्यातील मनाचे भावही गेले...!
मनोमनी येऊनी लाचारी,
कर्मही चटके देऊ लागले..
पैसा झाला मोठा परी,
कोण,कुणाचे आपले राहिले...?!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©®
