Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Ganesh Punde

Others

3.9  

Ganesh Punde

Others

शीर्षक :- कसं मिळेल हो पाणी...

शीर्षक :- कसं मिळेल हो पाणी...

1 min
222


ये रे ये रे पावसाची विसरली गाणी 

पाऊस पडेना कसं मिळेल हो पाणी


वृक्षतोड प्रदूषण जगण्याची घाई

चिमणी पाखर गेली छावणीत गाई

पाणवठा सुकलाया भेगा पडल्या रानी

पाऊस पडेना कसं मिळेल हो पाणी


पेरणीची लागलिया बळीराजा आस

अन्नदाता पोशिंदा तो भरवितो घास

काळ्या आईच्या सुताचे दुःख कोण जाणी

पाऊस पडेना कसं मिळेल हो पाणी


पाणी आडवा पाणी जिरवा संकल्पच भारी

पण शेती माती वर झाली राजकारण सारी

पाण्यासाठी भटकते जनता केविलवाणी

पाऊस पडेना कसं मिळेल हो पाणी



निसर्गही भ्रष्ट झाला करतोय चाळा

अवकाळी बरसुनी बसलाय भोळा

मनवाया धोंडी धोंडी करतात शहाणी

पाऊस पडेना कसं मिळेल हो पाणी


झाडे लावा झाडे जगवा जपा हिरवळ

आटणार नाही नद्या नाली अन् तळ

सुजलाम सुफलाम ठेवा ध्यानी मनी

पाऊस पडेल आणि मिळंल हो पाणी


Rate this content
Log in