शीर्षक :- दाम करी काम...!
शीर्षक :- दाम करी काम...!
आव शहाणपणात आणूनी,
साव..प्रबोधना पेटले..!
शब्द आपुले वाजवूनी,
ते...शब्दच गाजवून गेले...! १.
बंजर जमिनीला ह्यांच्याच,
असे कोंब..कसे फुटले?..!
ह्यांचेच होतात खटले,
जणू त्यांनाच आत टोचले...! २.
रूंद झाले...रस्ते...अता,
पुनर्वसनात गाव गेले...
परिस्थितीच की..तळ बुडाले?,
अधिवासांचे चित्कार उडाले...?! ३.
उंच इमारती,पेठ,दुकाने,
मुडपून..मोडून पिकही गेले..!
चकचकित सुख-चलन नवे,
तरी..! मनाचे भाव हरवले...!! ४.
आतल्या आत लाचार जनता,
गरीबांस थोडे चटके भाजले..
'दाम करी काम' मग,
हे सज्जन..कोण..? कुठले...?! ५.
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©®
