शीर्षक :- भेटू नवीन ठिकाणी...!
शीर्षक :- भेटू नवीन ठिकाणी...!
दीर्घ उसासे कसेसे
ठेव जपून मनात,
नाही कोणी पाहणार
ठेव जपून पत्रांत... १.
फुलपाखरांची स्वप्ने
पुन्हा येतील मनात,
गाभाडल्या वेलींचे-ते
ठेव सुवास श्वासांत... २.
ऋतू कसे बदलती?
असे काळाचे प्रवास,
कधी ढळत्या सांजेत
ठेव धरून आभास...! ३.
फक्त उतरत राही
जीना सरकते वय,
वेध विजन स्वप्नांची
ठेव जपून ती लय...! ४.
मान आभार भासांचे
टोक तरी कुठे आत?
भेटू नवीन ठिकाणी
ठेव एकेक ध्यानात...! ५.
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©®
