शिडाची सफर
शिडाची सफर
नौका विहार करण्याची
मजा काही औरच असते
शिडाच्या नौकेची सफर
खरोखरच करवी वाटते...
पाण्यावरती तरंगताना
वारा साथ देत असतो
तोल सावरूनी नावाडी
मार्ग काढुनी नेतो....
सीता राम म्हणे मनासी
हे दृश्य मनोहर मी रेखाटतो
ढगांची गर्दी आकाशी मी
जशीच्या तशी कागदावरी उतरवतो...