शब्दसाज
शब्दसाज
1 min
131
गारवा हवेतील
तनू बाई थरथरली
वसू पार गारठली
मनुने मिठी मारली...
ऊबदार वाटले छान
वसू भानावर आली
मिठीच्या पाशात
पूर्णच विरघळली....
शब्द काही सुचेना
बोलके बोल वसूचे
अबोल होवून विरले
शब्द मग वैभवचे...
शब्दसाज चढेना
शृंगार सुरू जाहला
प्रीतीला उधाण आले
प्रेमरस पाझरला....
वसू अन वैभव
झाले खूप आनंदी
मनोमन फुलांसवे
फिरू लागले स्वच्छंदी....