शब्दफुले
शब्दफुले
1 min
207
अक्षरे वेचली
वाक्ये बनवली
यमक साधले
कविता बनली.....
शिलेदार आम्ही
मराठी वाचतो
मराठीचा ध्यास
सतत असतो....
आम्ही शब्दप्रभू
शब्दात रमतो
ध्यास मराठीचा
सत्यात जाणतो....
शब्दांचीच फुले
वेचून हो घेतो
फुलांची कविता
आम्ही बनवतो....
काव्यही रचते
मराठी भाषेत
मानाचा मुजरा
या शिरपेचात....
