शब्दांची होडी
शब्दांची होडी
आठवणींच्या सागरावर,
तरळते शब्दांची होडी,
मनाच्या कोपऱ्यात साठलेली,
काही प्रश्नांची कोडी...
आठवणींच्या सागरावर,
मग आला भावनांचा पूर,
शब्दांची होडी बुडाली,
अन् मनावर माजला काहूर...
फक्त दोन क्षणांनी केला होता,
जवळच्या भावनांना छिन्न,
किनाऱ्यावर येण्याआधीच केला,
शब्दांच्या होडीला खिन्न...