शब्द
शब्द
1 min
73
शब्द मुळाक्षरांचा खेळ
शब्द भावनांचा मेळ
शब्द काळाचे दान
शब्द वेळेचे भान
शब्द प्रकाशाची आस
शब्द अंधाराचा भास
शब्द हिरवळीचे रान
शब्द कर्तव्याची जाण
शब्द लेखणीचे कर्म
शब्द विचारांचे मर्म
शब्द वाचकास रास
शब्द कवीचा श्वास