शब्द माझे सोबती
शब्द माझे सोबती
शब्द माझे सोबती
सुख दुःखाचे गीत गाती
शब्द , आयुष्याचा आधार
शब्द मनात राहती
शब्द...शब्द एक भाषा
शब्द...शब्द एक आशा
शब्द...दिलेली..अभिलाषा
शब्द...तोच दाखवी दिशा..!
शब्द...असतो मनाचे प्रतिबिंब
शब्द...मनास भिजवितो चिंब
शब्द ..आरसा मनाचा
शब्द सोबती जीवनाचा
शब्द...शब्द तोच असतो
पण ,उच्चाराने अर्थ बदलतो
शब्दच मनास फुलवितो
शब्दच मनात सलतो
शब्दच ...अर्थ..असतो
काळीज वेधणारा पार्थ असतो
कधी शब्द उतावीळ होतो
अन् शब्द लडिवाळही होतो
शब्द मन जोडतो
शब्दच मन तोडतो
शब्दातीत "शब्द" मौन आहे.
अर्थांशिवाय "शब्द"गौण आहे...!