सेवा
सेवा
1 min
147
निस्वार्थी सेवेचा |ध्यास मनी ठेवा ||
जगा वाटू द्यावा |अभिमान ||१||
कठिण कार्याची |भिती नको मनी ||
मृदू असे वाणी | अखंडित ||२||
मानवता धर्म |सदैव जपावा ||
सेवेला धावावा|वेळोवेळी ||३||
मानुसकी जपा |सत्कर्म करुन ||
अहम सारुन |गरजेला ||४||
निरपेक्ष भाव |सदा आचरावा ||
आनंद मानावा |सहकार्ये ||५||
नित्य करा सेवा |पुन्य मिळे हाती ||
बदलावी वृत्ती |सेवाभावे ||६||
सुप्रिया वदते | कार्य करा सदा ||
स्वतःशीच वादा | कार्याठायी ||७||