सौंदर्यवती मी
सौंदर्यवती मी
काय तुम्ही माझ्या
फोटोवर पण कविता करता
माझ्या काळ्या रंगाला
का इतकं महत्व देता
काय करणार आम्ही
आम्हाला या रंगाच
वरदान आहे
आमचा तसा पेटंट आहे
पांढऱ्या दातांची
आम्हाला भेट आहे
आमचं बाबा
देवासी संधान थेट आहे
आनंदाची आमच्या
गालात मोठी शेती आहे
त्या शेतीत सदैव
खुलत उन्नत्त पीक आहे
अप्रूप वाटत तुम्हाला
आमच्या रंगाच
मलाही अप्रूप वाटते
कवींच्या वेगळ्या ढंगाचं
करा कितीही कविता
रंग आमचा पक्का आहे
तुमच्या काव्य संपदेचा हा
मलाही खरच सुखद धक्का आहे....!!!