Rajendrakumar Shelke

Romance


4.0  

Rajendrakumar Shelke

Romance


सौंदर्य

सौंदर्य

1 min 449 1 min 449

केस तुझे ते विखुरलेले 

खट्याळ वारा केसांमध्ये,

डोळ्यांमधली धुंद शरारी

स्वप्न दिसे मज नेत्रांमध्ये.


हास्य फुले अधरांवर

चेहऱ्यावर सौंदर्य खुले,

राणी तू माझ्या मनाची

हृदयी मज घायाळ केले.


 नाकी सजे साज नथीचा

 शोभे चंद्रकोर ही कपाळी,

 नयन बाण मदहोश करी

मुखचंद्रावरी खुलते कळी.


सुंदर ललना नवकांतीची

अवतरली भूलोकी अप्सरा,

तुज पाहता हरवुन गेलो

काय वर्णू तुझा नखरा.


गाल गुलाबी ओठ रसिले

मन वेडावले माझे अंतरी,

तुझ्या रूपाने अवतरली

स्वर्गरुपी अप्सरा या भूवरी.


Rate this content
Log in

More marathi poem from Rajendrakumar Shelke

Similar marathi poem from Romance