सैनिक प्रेमपत्र
सैनिक प्रेमपत्र
मी एक सैनिक आहे
म्हणून तू माझ्यावर भाळली
माझ्या शौर्याचे गीत
प्रेमाने तू गायली
म्हणतेस आता सोड नोकरी
भीती तुला विरहाची आली
नोकरी नाही ही सेवा आईची
आई सोडण्याची बात कशी आली
हृदय अर्पिते तुला मी माझे
मी प्रेम तुझ्यावर करतो
शरीर घडविले या मातीने
मातीस अर्पण शरीर करतो
मन समजून घे प्रिया तु माझे
का इतकी हट्ट तू करते
जीव माझा तुझ्यावर जडला
पण जीव न्योच्छावर देशावर करते
जवळ असलो तर बोर होशील
दुरावातच गोडी असते
अश्रुंच्या पाण्याने सखे
प्रेमांकुर आणखी फुलत असते
कधी मी येऊ सांग प्रिये
कधी तू माझी होशील
शहीद मी जरी झालो तरी
परमवीर चक्र तू मिळवशील