सावली बाेलली
सावली बाेलली
1 min
247
सावली बाेलली एक दिवस, मी कधीही नाश पावणार,
प्रत्येकासाठी ताे दिवस, मी निश्चितच उगवणार...
सावली बाेलली एक दिवस, क्रयशक्ती घालताेस वाया,
साेड नाद भाैतिक जगाचा, पाश असताे माेह,माया...
सावली बाेलली एक दिवस, मुख्य प्रतिमेला जप,
जीवन असते अनमोल, ते असते एक ऐहिक तप...
सावली बाेलली एक दिवस, मलाही असते मन,
मीच असते तुझी सावली, सावलीच मुख्य धन...