सासुरवास, जीवन वाट
सासुरवास, जीवन वाट
जीवन वाट
जीवनाच्या वाटेवर एकटी अशी,
चुक काय केली सांगे ना कोणी.
विचारते नातलगांना सांगा चुक ती,
करते विनवणी हातजोडुनी.....
विचार करुन करुन थकली पुर्ण,
कोणता भारी गुन्हा केला असेल मी.
यातचं चाललयं माझं अर्ध उभार वय,
नागमोळी वळणावर थेट उभी मी.......
मनात येते एकस एक
विचारी पिंगा,
कधी संपणार आहे तरी हा वनवास.
जीवन जगणं आलं नाकीनव,
कुठे जाऊ, काय करु धरू कोणाची आस......
-----
सासुरवास
घराजवळ चे मावसे,
तुले म्हणुन सांगते.
घरी मल्ले येऊन,
असा असा झोडते....
गावी हररोज जाते,
अन् मई सासु नंदन.
लिहु लिहु सांगते,
मय ग़राणां वर गराणं....
घरी येऊन मल्ले
असा असा झोडते.....
वापसी मधी मल्ले वं,
कलमेजे प्रर्यन्त मारते.
डोळॆ वटारल्यावर मग,
पाणी आणुण पाजते......
घरी येऊन मल्ले ,
असा असा झोडते...
शुद्ध आणे पाणी पाजुन
अन् बसे मुका होऊन.
मनी राग लोभ धरे ,
सांजे जेवे गोड बोलुन...
घरी येऊन मल्ले ,
असा असा झोडते....
नंदा सासु चहाड्या लावे,
रोज रोज भांडाभांडी.
बट लावे कामा न धामाची,
मारु मारु रोज काढे दिंडी..
घरी येऊन मल्ले,
असा असा झोडते....
तुल्ले म्हणुन सांगते,
दादा वहीनी एक दिस.
नेरे येऊन माहेर पणाले,
लई दिस झाले डोळयाले न दिसं....
दादा येरे आणायले,
मल्ले चारचाकी गाडीनं
दाऊन देईन नव-या ले
माहेरी नाही उन कोण्या वाणानं...