साक्षी
साक्षी
1 min
189
झाडावर काडीकाडीन जोडून
पक्षी घरटं बांधून
आपला संसार सजवतो
झाड तेंव्हा हसत असतं
आलाप घेत असत....
झाडावर दोर बांधून
बळीराजा आत्महत्या करून
आपला संसार संपवतो
झाड तेव्हा रडत असतं
विलाप करत असतं....