साधना
साधना
नित्य साधना करतो मी
बसुनी ओट्यावरी
मी माझ्यातच रमतो
हाती कुंचला घेतल्यावरी....
रंगांचा मी स्वामी
मला मजहर अली खान म्हणती
कला पाहुनी माझी अलौकिक
चित्रकार म्हणोनि मजला ओळखती...
माझेच चित्र जणू मी
रेखाटले आज कागदावरी
नव्हते कोणी उभे
ते पाहण्या शेजारी...
कला साधना अखंड अविरत
सदैव नित्य चाले माझी
मीच माझ्या केलवर झालो
पाहुनी आज हो राजी...!