साद जरा दे तू
साद जरा दे तू
हाक दिली मी तूला
साद जरा दे तू
स्तब्ध शांत आहे सारं
संवाद जरा दे तू || 0 ||
नजर तुझ्या वाटेकडे
तुझा आवाज ऐकू येतो
तुझ्या आवाजाचा भास
अलगद मला मिठीत घेतो
खुपतो हृदयात एकांत
नाद जरा दे तू
स्तब्ध शांत आहे सारं
संवाद जरा दे तू || 1 ||