Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

रुंजी

रुंजी

1 min
149


रुंजी घालती मनात

सखे स्वर भावपूर्ण

ऐकूनही खूप वेळा

गमे मजला अपूर्ण


कंठस्वर भाववेडा

दुःखामधे भिजलेला

कसा अचूक येतसे

चपखल बसलेला


वादनात तुझ्या असे

खास अशी विविधता

अनवट रागांचीही

सर्वसमावेशकता


समेवर गज येता

दाद देती साथीदार

मुखावरी विलसते

सरस्वती तेजोमय


भाव भावनांचे गोफ

रुंजी घालती मनात

रेशीमलडीच जणू

जपू किती श्रवणात!!


सुखदुःख भावनांना

स्वरांमधे तू गुंफुनी

सरस्वतीस वंदुनी

कलाक्षेत्री यशस्विनी


स्वर सरिता अखंड

ओसंडून खळाळते

पूर्व जन्मीचे संचित

भाग्यवतीस लाभते 


भाग्यवान रसिकही

स्वर रुंजीच घालती

मेळ सुखद सर्वदा

राहो स्वर जगताती



Rate this content
Log in