Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Priti Dabade

Others

4  

Priti Dabade

Others

रंगमंच

रंगमंच

1 min
163


पडदा हळूहळू

वर सरकतो

कलाकारही मग

सज्ज होतो


रंगमंच असतो

खूप मोठा

कलाकार भूमिकांचा 

उघडतो कोठा


आवाजातील उतारचढाव

संवादातील संवेदना

पोहचते भूमिकेतून

प्रेक्षकांपर्यंत भावना 


भूमिकेत आपल्या

जीव ओततो

प्रेक्षकांना गुंतवण्यात

सफल होतो


जीवन आहे

एक रंगमंच

प्रत्येकाच्या डावपेचांचा

असतो संच


रंगमंचावर चढतो

वेगवेगळा मुखवटा

खरं भासवून

रंगवतो खोटा


रोज एक

नवा खेळ

सांभाळत सारे

घाली मेळ


Rate this content
Log in