रडता रडता
रडता रडता




सुख-दु:खाच्या गुंफणीतून
सुबक रेखीव वस्त्र बनते
आयुष्यातील एक क्षण तरी
दु:ख आठवून रडू वाटते
दु:खांमधून फार नाही पण
अंधुक किंचित गोडी भासे
आयुष्याच्या यंत्रामधून
सुखाचा नाद सोडून जावे
कधी एकांती दुःखे आळवून
मन मोकळे रडून घ्यावे
रडतानाही असे रडावे
वाऱ्यासम ते उधळून द्यावे
चालू मागील सारी दु:खे
अश्रूरूपे वाहून द्यावे
सुखामागे धावून धावून
दु:खात जगणे न विसरावे
रसिकतेने चाखाल दु:ख तर
दु:ख सुद्धा गोड लागते
रडता रडता मात्र मनाला
सुखे कोरडे सुख लाभते