Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Jadhav

Action Classics Inspirational

3  

Savita Jadhav

Action Classics Inspirational

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

1 min
152


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,

ओळखतात यांना सकलजन,

भजन आणि किर्तनातून घडवले,

घडवले जातीभेद,अंधश्रद्धा निर्मूलन.


केली गुरुकुंज आश्रमाची स्थापना,

प्रबोधनाचे वैशिष्ट्य खंजिरी भजन,

देशभरात हिंडुन केले अध्यात्मिक,

सामाजिक व राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रबोधन.


ग्रामोन्नती व ग्रामकल्याण घडवण्याचा,

केन्द्रबिंदू जणू त्यांच्या विचारसरणीचा,

केला मूलभूत विचार महाराजांनी,

ग्रामविकासाच्या विविध समस्याचा.

 

व्यसनधिनतेचा केला तीव्र निषेध,

ऐहिक व पारलौकिकतेचा समन्वय साधला,

स्त्री ला अज्ञान,दास्यात ठेवणं अन्यायकारक आहे

हे पटवून देऊन,

समुदायिक,सर्वधर्मिय प्रार्थनेचा पुरस्कार केला.


ग्रामगीता लेखन ही जणू

महाराजांच्या वाड:मय सेवेची पूर्ती,

राष्ट्रपती भवनात गायले खंजिरी भजन,

या भजनाने मिळाली राष्ट्रसंत म्हणून कीर्ती.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action