Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract Inspirational

4.3  

Neha Ranalkar

Abstract Inspirational

राहू देत ऋणांत तुझ्या

राहू देत ऋणांत तुझ्या

1 min
228


गान कोकीळा कुठे हरपली ती

ऐन वसंतात मोगरा फुलतांना |

झाली सारी सिनेसृष्टीच मुकी का

गाण्यांतून तुझा स्वर खुलतांना | |१| |


होतीस घालित साद आमच्या

भावनांना तुझ्या दैवी सुरांतून |

नसतांना वर्षा राहिलीस भिजवत

चिंब तुझ्या त्या सप्तस्वरांतून | |२| |


कळली नाही तुझी महती जगा

आमच्याच सभोवार असतांना |

गेल्यावर कळले काय गमावले 

तुझा स्वरपंचम कंठी फसतांना | |३| |


समजले गं जन पळभर म्हणतील

हाय हाय हे भा.रा.तांब्याचे काव्य |

पसायदान संत ज्ञानेश्वरांचे,तुझ्या

स्वरांत गायलेली भजनं सुश्राव्य | |४| |


नाही काया अमर राहते परी

सत्कार्य अजरामर चराचरांत |

गुंजतील तुझीच गाणी सर्वत्र

अनंतकाळ सदैव घराघरांत | |५| |


हरपली प्रज्ञा झाले शब्द निष्प्रभ 

उपमेत लता तुजला बांधतांना |

आजन्म राहू देत ऋणांत तुझ्या

दैवीसुरांशी नाते मी सांधतांना | |६ ||


गानसम्राज्ञी , भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने व्यथित होऊन मला सहज सुचलेलं हे काव्य! ह्या पलीकडे मला आजवरच्या माझ्या आयुष्यात अनुभवलेले त्या गानसम्राज्ञीचे दैवी सप्तसूर हे तिच्या ऋणातनं कधीच मुक्त होऊ नये असे भाव माझ्या अंतरीचे ह्या कवितेतून व्यक्त केले आहेत.



Rate this content
Log in